
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने साजरा होणार जागर महोत्सव
रत्नागिरी: १०० व्या नाट्यसंम्मेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने जागर महोत्सवाचे आयोजन अखंड महाराष्ट्रभर करण्यात आले आहे. त्यातील रत्नागिरी केंद्रावर या महोत्सवातील सहा स्पर्धा सादर होणार आहेत. यामध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यगीत गायन स्पर्धा,नाट्यवाचन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा या सर्व सहा स्पर्धा मिळून रत्नागिरी केंद्रावर एकूण ५२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून या स्पर्धा कुवारबाव ब्राम्हण सेवा संघाच्या यशवंत हरी गोखले भवन, संभाजीनगर साळवी स्टॉप लिंक रोड, वेधशाळे समोर नाचणे, रत्नागिरी येथे सादर होणार आहेत.
दिनांक २ फेब्रुवारी ते दिनांक ८ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून. या स्पर्धेच्या निमित्ताने उत्तमोत्तम कलाकृती बघण्याची संधी रत्नागिरीकरांना उपलब्ध होणार आहे. तरी त्यांचा सर्वच कलाप्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com