
रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. अनेक ठिकाणी पावसाला ( सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे आहेत, कारण, अनेक भागात वादळी वाऱ्याह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासात राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किमी वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
www.konkantoday.com