
५७ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीची निधी सप्रे, स्वरा मोहिरे राज्य उपविजेती*
__महाराष्ट्र् कॅरम असोसिएशन आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या ५७ व्या सब जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या १२ वर्षांखालील कॅडेट मुलींच्या गटात अंतिम फेरीत रत्नागिरीच्या ८ वर्षांच्या निधी सप्रेला जळगावच्या ज्ञानेश्वरी धोंगडे १४-१०, २-२१ व १७-९ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करून विजय मिळविला.१४ वर्षांखालील मुलींच्या एकेरी अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेवर पुण्याच्या तनया पाटीलने १९-५, २१-० असा विजय मिळवून गटाचे विजेतेपद पटकाविले. तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात रत्नागिरीच्या स्वरा कदमवर सिंधुदुर्गच्या पूर्वा केतकरने ११-५, १०-८ अशा विजयाची नोंद केली. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या द्रोण हजारेवर मुंबई उपनगरच्या वेदांत राणेने १०-१४, १४-९, व १७-४ असा निसटता विजय मिळविला. वाराणसी येथे आयोजित केलेल्या राष्टीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात वरील सर्व खेळाडूंची निवड करणात आलेली आहे. विजेत्या खेळाडूंना विश्व् कॅरममधील विजेते संदीप दिवे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार केतन चिखले, सचिव अरुण केदार व आंतर राष्ट्रीय पंच अजित सावंत यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन श्री प्रदीप भाटकर ( अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुरेंद्र देसाई ( उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुचय अण्णा रेडीज ( सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) व श्री मिलींद साप्ते ( सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) यांनी केले आहे. www.konkantoday.com




