
गेल्या ३ वर्षापासून सुरू असलेला एन्रॉन पूल १५ दिवसात वाहतुकीस खुला होणार.
अतिवृष्टीत खचलेल्या आणि गेल्या ३ वर्षापासून सुरू असलेल्या उक्ताड-फरशी मार्गावरील एन्रॉन पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. सध्या पुलाच्या खालील बाजूस करण्यात आलेल्या कॉंक्रिटीकरणावर क्युरींग सुरू आहे. त्यानंतर लोड टेस्ट होऊन हा पूल येत्या पंधरा दिवसात वाहतुकीस खुला होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून देण्यात आली.या पुलाचा. एक पिलर २०२१ च्या महापुरात खचल्यानंतर पूल धोकादायक बनला. परिणामी या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. सुरुवातीची दोन वर्षे या पुलाच्या दुरुस्तीकडे शासनाने लक्ष दिले नाही. आमदार शेखर निकम यांनी या पूल दुरुस्ती कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार या पुलासाठी निधी मंजूर झाला.www.konkantoday.com




