
स्मार्टफोन स्वस्त होणार! स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात*
___केंद्र सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात केली आहे. हे आयात शुल्क १५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आले आहे.याबाबतची अधिसूचना अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने अंतरिम अंर्थसंकल्पापूर्वी हा निर्णय जारी केला आहे.देशातील स्मार्टफोन बनवण्याचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. यात बॅटरी एन्क्लोजर, रियर कव्हर्स आणि प्लास्टिक आणि धातूच्या मिश्रणातून बनवलेल्या विविध यांत्रिक घटकाचा समावेश आहे. या निर्णयाचा मोबाइल फोन उत्पादन क्षेत्राला फायदा होणार आहे. तसेच त्याच्या विस्ताराला चालना मिळेल आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.www.konkantoday.com