
जिल्ह्यात एकही जागा भाजपाला न मिळाल्याने पदाधिकारी नाराज,अपक्ष लढण्याच्या तयारीत
नुकतीच शिवसेना – भाजप महायुतीची घोषणा करण्यात आली.या अगोदरच शिवसेनेने आपल्या काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले होते.रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आपल्या उमेदवाराला एबी फॉर्म दिले.यामुळे युतीचा फॉर्म्युलयात जिल्ह्यातील पाचही सीट शिवसेना लढणार हे निश्चित झाले आहे.या निर्णयामुळे भाजपचे काही पदाधिकारी नाराज असल्याचे समजते.भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गुहागर व दापोली मतदारसंघांवर दावा केला होता.परंतु वरिष्ठ पातळीवरून तो दावा मान्य केला गेला नसल्याचे समजते.युतीच्या या निर्णयामुळे दापोली मतदारसंघातील भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे दापोली विधानसभा मतदार संघातून आज अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याचे कळते त्याचप्रमाणे गुहागर मतदारसंघात डॉक्टर विनय नातू देखील नाराज आहेत.आता पक्ष काय भूमिका घेतो हे पाहावं लागणार आहे.
www.konkantoday.com