- चिपळूण रेल्वे स्थानकावर विक्रीसाठी वडापावावर चक्क पाय ठेवून झोपी गेलेल्या विक्रेत्याचे छायाचित्र सोमवारी सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यानंतर संबंधित विक्रेता सोमवारी रात्रीच गायब झाला असून मंगळवारी रेल्वे प्रशासनाने संबंधित वडापाव सेंटरवर ५ हजारांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.कोकण रेल्वेतून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. या प्रवासात तळलेल्या समोशासह वडापाव हे हमखास असतात. हे पदार्थ बनवणारे बहुसंख्य हे परप्रांतीय आहेत. चिपळूण रेल्वेस्थानकात सोमवारी एक परप्रांतीय विक्रेता चक्क वडापावावरच पाय ठेवून गाढ झोपी गेल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एका प्रवाशाने त्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल केले. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणार्या या विक्रेत्याची ही किळसवाणी छायाचित्रे पाहून सर्वत्र संतापाची लाट पसरली. छायाचित्र व्हायरल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा विक्रेता रातोरात रेल्वे स्थानक परिसरातून गायब झाला आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वे प्रशासनानेही स्थानकांवरील ज्या फलाटावरील वडापाव सेंटरमधून संबंधित विक्रेत्याने हे वडापाव विक्रीसाठी आणले होते, त्या सेंटर चालकाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे समजते. www.konkantoday.com
Back to top button