
लांजा भूमी अभिलेखवर नागरिकांची धडक*
*_लांजा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून जनतेच्या कामांचा होणारा खोळंबा व कागदपत्रे मिळावीत म्हणून २ ते ३ महिने वाट पाहणे तसेच सर्वे व इतर कामे देखील वेळेत होत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. असे असतानाच लांजा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालयावर धडक देण्यात आली आणि या कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचण्यात आला.लांजा भूमी अभिलेख कार्यालय हे कायमच वादाच्या दृष्टीने चर्चेत राहिले आहे. या कार्यालयात येणार्या तालुक्यातील जनतेला, वयोवृद्ध नागरिकांना कधीही कामे वेळेत होत नाहीत. तसेच नकाशेही वेळेत मिळत नाहीत. किरकोळ कामांसाठी गोरगरीब जनतेला दहा ते पंधरावेळा फेर्या माराव्या लागतात. एखादा दाखला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर तो २ ते ३ महिन्यांनी मिळतो. सर्वेसाठीही तारखा मिळत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे. यामुळे या कार्यालयाच्या एकूणच अनागोंदी कारभाराबाबत तालुक्यातील जनतेतून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.www.konkantoday.com