रत्नागिरी नगर पालिकेत मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार – राज असरोंडकर*
*_ मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्रातील अनेक नगर परिषदा, महानगर पालिकांमध्ये हा भ्रष्टाचार सुरू आहे. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये १५ ते २० कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप लेबर राईट संस्थेचे संस्थापक राज असरोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.जानेवारी महिन्यापासून विशेष भत्त्याप्रमाणे जर रत्नागिरी नगर परिषदेने कंत्राटी कामगारांना वेतन दिले नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू, मुख्याधिकार्यांवर कारवाई व्हावी, ही मागणी करू, असा इशारा राज असरोंडकर यांनी दिला आहे. लेबर राईटस या संस्थेने रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला रत्नागिरी तालुका समन्वयक राकेश मीना, विजयकुमार जैन उपस्थित होते.यावेळी बोलताना संस्थापक राज असरोंडकर म्हणाले की, रत्नागिरी नगर परिषदेतील कंत्राटी अकुशल कामगारांना १७ हजार ६४१ रुपये पगार मिळाला पाहिजे, त्याचबरोबर पीएफ, इखसआयई आणि बोनस मिळाला पाहिजे, पण रत्नागिरी नगर परिषदेतील अकुशल कामगारांना ७ ते १० हजार रुपयांपर्यंतच पगार मिळतो. हे सर्व बंद होवून कामगारांना संपूर्ण पगार मिळाला पाहिजे.दि. १ जानेवारी २०२४ ते जून २०२४ या कालावधीसाठी विशेष भत्ता कामगार आयुक्तांकडून या आठवड्यात घोषित होईल. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात जानेवारी महिन्याचा पगार नव्या घोषित विशेष भत्त्यानुसार करण्यात यावा, ती जर करण्यात आली नाही तर फेब्रुवारी महिन्यात आम्ही आमरण उपोषणाला बसू. यामध्ये उपोषणामध्ये मुख्याधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करू, असा इशारा राज असरोंडकर यांनी दिला. कामगारांना त्यांचा पगार ७ तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.www.konkantoday.com