मंडणगड आरपीआयचे उपोषण सुरूच*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तालुका शाखेच्यावतीने माजी तालुकाध्यक्ष राजेश गमरे यांनी आरोग्य यंत्रणा व म्हाप्रळ-आंबेत पुलप्रश्‍नी प्रजासत्ताक दिनापासून उपोषण छेडले आहे. यातील आरोग्य विभागाबाबतच्या प्रश्‍नावर तोडगा निघाल्याने त्याबाबतचे आंदोलन मागे घेण्यात आले, तरी पुलप्रश्‍नी तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच होते.सोमवारी माजी आमदार सजय कदम, शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे व समर्थकांनी आंदोलनस्थळी भेट दिली. कदम यांनी तहसीलदार शेजाळ यांना आंदोलन स्थळी पाचारण करून प्रश्‍नांबाबत चर्चा केली. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी ३० जानेवारी रोजी ग्रामीण रूग्णालयात एम.बी.बी.एस. डॉक्टर उपलब्ध करून देत असल्याने लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले. त्यामुळे गमरे यांनी आरोग्य विभागाच्या विरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे स्पष्ट केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button