भारतीय तटरक्षक दलाची रत्नागिरी-मुंबई बाईक रॅली*
भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीद्वारे तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ३० जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी ते मुंबई बाईक रॅली पार पडली. ही रॅली पुन्हा शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीकडे प्रयाण करणार आहे.भारतीय तटरक्षक दल हे १ फेब्रुवारी २०२४ रोजी आपला ४८ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या दिनाच्या अनुषंगाने तटरक्षक दल विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेली ही बाईक रॅली तटरक्षक दलाच्या प्रांगणापासून सकाळी सुमारे ८ वाजता सुरू होवून वरळी मुंबई येथील तटरक्षक क्षेत्रीय मुख्यालय वरळी मुरूड मार्गे मुंबई असा ४०० किमी अंतराच्या निर्धारित मार्गावर पार पडली. या रॅलीला भारतीय तटरखक वायु अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर समादेशक विकास त्रिपाठी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या बाईक रॅलीमध्ये दटरक्षक दलाच्या २३ जवानांनी सहभाग घेतला. www.konkantoday.com