
चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण येथे १८३ गुंठे जमिनीवर देवराई विकसित केली जाणार
चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण येथे १८३ गुंठे जमिनीवर देवराई विकसित केली जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते गुलाब सुर्वे यांनी स्वयंस्फूर्तीने तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे दिला आहे. जागतिक पर्यावरण दिन दि. ५ जून रोजी या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव सुर्वे यांच्यामार्फत ग्रामपंचायतीकडून देवराई विकसित करण्याचा प्रस्ताव येताच त्याचे सर्व्हेक्षण व त्यासंदर्भातील बैठका घेण्याचे काम जलदूत शाहनवाज शाहू आणि पर्यावरणप्रेमी अजित जोशी यांनी सुरू केले. सामाजिक भावनेतून प्रत्यक्षात नकाशे बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या देवराईत सुमारे १२५ जातीची १५०० रोपे लावण्याचा मानस आहे. www.konkantoday.com