- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही बातमी अतिशय महत्त्वाची असून, ती थेट विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांशी संबंधित आहे.लवकरच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होणार आहे. होणारेय. मात्र या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचं वादळ घोंगावतंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळानं बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे आणि या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार दिलाय. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांकडे बोर्डाकडून लक्ष दिलं जात नसल्यामुळं महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने अखेर टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यानुसार शाळा आणि शाळेतील कर्मचारी वर्ग प्रात्यक्षिक परीक्षांसाठी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं. आपल्या या कृतींमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलं तरीही नाईलाज म्हणून हे शेवटचं पाऊल उचललं जात असल्याचं राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने म्हटलं आहे.www.konkantoday.com
Back to top button