पडवे गावचा गिर्यारोहक प्रथमेश वालम याने अजिंठा कड्यावर फडकवला तिरंगा*
__भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत अजिंठा सातमाळा डोंगररांगेवरील इंद्राई, राजेदर, कोळथरे, अचलगड, अहिंवंतगड आणि महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला धोडप या सहा दुर्गम भागातील डोंगरी किल्ले सर करत पडवे गावचा गिर्यारोहक प्रथमेश वालम आणि त्याच्या सहकार्यांनी प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकावला.प्रथमेश वालमने केवळ जिद्द आणि दृढ विश्वासाच्या बळावर सकाळच्या सत्रात कडाक्याची थंडी, दुपारच्या सत्रात रखडरखते ऊन, टोकांवर वेगाने वाहणारा वारा याची पर्वा न करता अजिंठा सातमाळ डोंगरावरील इंद्राई, राजदेर, कोळथरे, अचलागड, अहिवंतगड आणि महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला धोडप या सहा दुर्गम भागातील डोंगर किल्ले सर केले. यावेळी प्रथमेश वालम व त्यांचे सहकारी रूपेश बंडबे, शिवाजी बोडके, आकाश शेलार, सुशांत खोंडगे या गिर्यारोहकांनी गड सर करीत तिरंगा फडकवला. www.konkantoday.com