नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बारसू गावात यावे, त्यांना विरोध काय असतो हे दाखवून देऊ-खासदार विनायक राऊत*
केंद्रीय मंत्री, भाजप खासदार नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरी होत असलेल्या बारसू गावात यावे, त्यांना विरोध काय असतो हे दाखवून देऊ असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.रविवारी नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना फटकारले होते. त्यानंतर आता खासदार राऊत यांनी आव्हान दिल्याने रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्यानिमित्ताने 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या निमित्ताने ठाकरे यांची चिपळूणमध्ये सभादेखील होणार आहे. त्यावेळी मैदानाची पाहणी केल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली. www.konkantoday.com