- खिचडी घोटाळा आणि आमचा काहीही संबंध नाही. तो आहे असं जर संजय राऊत यांनी सिद्ध केलं तर आम्ही राजकारण सोडून देऊ असं शिंदे गटाचे राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांच्या लोकांची नावं या घोटाळ्यात आले आहेत.जो पक्ष सोडतो तो चोर, खोके सरकार वगैरे टीका करतात. तोपर्यंत हे शहाणे, आमच्यावर प्रेम करणारे. पक्ष सोडेपर्यंत मांडीवर का घेऊन बसता? असा प्रश्न अमेय घोले यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. आज राहुल कनाल आणि अमेय घोले या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.“मी आज बाळासाहेब ठाकरे भवनात आहे. मी आज बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो. आमच्यापैकी कुणाचंही नाव तुम्हाला कुठल्याही घोटाळ्यात आढळून आलं तर, कुठलीही कंपनी असो किंवा तुम्ही केलेला खिचडी घोटाळा, डेड बॉडी बॅगचा घोटाळा, रेमडिसिव्हिरचा घोटाळा तुमच्या कुठल्या घोटाळ्यात आमचं नाव आलं तर आम्ही राजकारण सोडू. मात्र आमचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्हीही बाळासाहेबांची शपथ घ्या आणि तुमचं म्हणणं खोटं असेल तर राजीनामा द्या.” असं आव्हानच राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.www.konkantoday.com
Back to top button