खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन*
*
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्याच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी अनिल बाबर यांची ओळख होती. शिवसेनामध्ये उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं.www.konkantoday.com