कनकाडी येथे शॅमेलियन जातीचा दुर्मिळ सरडा आढळला*

कनकाडी येथे शॅमेलियन जातीचा दुर्मिळ सरडा आढळून आला आहे.अमित पंडित यांना दाभोळे-कनकाडी रस्त्यावर हा सरडा दिसला. तीन वर्षांपूर्वी हा सरडा कनकाडीतच काजूच्या बागेत आढळून आला होता. पंडित रविवारी या रस्त्याने प्रवास करत असताना हा सरडा त्यांना रस्त्यावर चालताना दिसून आला. शॅमेलियन जातीचा हा सरडा अत्यंत दुर्मिळ समजला जातो. आफ्रिकेत आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो. साधारण सहा इंच लांब असलेला हा सरडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button