
बीएसएनएलच्या ३२६ टॉवरपैकी ११० टॉवर बंद
रत्नागिरी :एकीकडे जीओसारख्या खाजगी कंपन्या मोबाईल क्षेत्रात व मोबाईल ग्राहकांसाठी नवनवीन आकर्षक योजना आणत असताना शासनाच्या भारत दूरसंचार निगमच्या मोबाईल कंपनीची जिल्ह्यात बिकट अवस्था झाली आहे. मोबाईल टॉवरचे बिलही बीएसएनएल भरू शकत नसल्याचे उघड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बीएसएनएलचे ३२६ मोबाईल टॉवर असून बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या अडीच लाख आहे. असे असूनही बीएसएनएलने महावितरणचे सुमारे ७८ लाख ५६ हजारांचे बिल थकित ठेवले आहे. वेळोवेळी सूचना देवुनही बीएसएनएलने बिल न भरल्याने शेवटी महावितरणने कारवाई करत बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडीत केला. यामुळे जिल्ह्यातील ११० मोबाईल टॉवर बंद पडले असून बीएसएनएलच्या ग्राहकांची मोबाईल सेवा देखील कोलमडली आहे.
www.konkantoday.com