- श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी आयोजित व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २ री श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२३-२४ रोजी राधाकृष्ण मंदीर, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. सदर स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महीला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी १५०/- रुपये व दुहेरी गटासाठी ३००/- रुपये याप्रमाणे राहील. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धक असणे आवश्यक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासहीत तालुका प्रतिनिधीकडे द्यावात. स्पर्धेत खेळणासाठी पांढरा रंगाचा तिशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परीधान करणे आवश्यक आहे.स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राज्यस्तरीय पंच श्री मंदार दळवी व श्री सागर कुलकर्णी त्याच प्रमाणे स्पर्धा प्रमुख म्हणून श्री सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन स्पर्धा आयोजक श्री मंगेश संसारे ( अध्यक्ष, श्री हनुमान मित्र मंडळ, मारुती आळी, रत्नागिरी), श्री प्रदीप भाटकर ( अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुचय अण्णा रेडीज ( सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) व श्री मिलींद साप्ते ( सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) यांनी केले आहे. www.konkantoday.com
Back to top button