- किरकोळ कारणावरून चुलत भावाला शिवीगाळ करत दमदाटी करून त्याच्या डोक्यात काठी मारून त्याला जखमी केल्याची घटना लांजा तालुक्यातील कोंडये रांबाडेवाडी येथे शनिवारी २७ जानेवारी रोजी ८.१५ वा. घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील कोंडये रांबाडेवाडी येथे समीर पांडुरंग पंडित (५३) आणि त्यांचा चुलत भाऊ मिलिंद मुकुंद पंडित (५१) यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू आहेत. २७ जानेवारी रोजी मिलिंद याने भाऊ समीर पंडित याला शिवीगाळ केली. याबाबतची खबर स्मिता मोरेश्वर पाध्ये यांनी ११२ नंबरवरून कॉल करून पोलिसांना दिली होती. आपल्याला शिवीगाळ करतो याचा जाब विचारण्यासाठी समीर पंडित हे रात्री ८.१५ वा. च्या सुमारास मिलिंद याच्या घरी गेले असता मिलिंद याने अंधारात लपवून ठेवलेल्या लाकडी काठीने समीर पंडितच्या डोक्यात प्रहार केला.www.konkantoday.com
Back to top button