राज्यसभेत भाजप तीन, काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा मार्ग मोकळा*

_राज्यसभेत भाजप तीन, काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा मार्ग मोकळा, जागा आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निवृत्त होत असले तरी पक्षातील फुटीमुळे या दोन्ही पक्षांना जागा मिळणार नाही.निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे तीन, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. हे संख्याबळ कायम राहणार असले तरी फाटाफुटीमुळे शिवसेना शिंदे गट तर राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला प्रत्येकी जागा मिळेल. याचाच अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील शरद पवार गटाला आपापली जागा कायम राखता येणार नाही.यंदा राज्यसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता असेल. भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने विधानसभेतील एक जागा रिक्त आहे. भाजपचे १०४ आमदार असले तरी १३ अपक्ष व अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपला तीन जागा सहजपणे मिळू शकतात. काँग्रेसचे ४५ आमदार असल्याने या पक्षाचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ४० पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असून, अपक्ष व छोट्या पक्षांचे १० जण बरोबर आहेत. या संख्याब‌ळाच्या आधारे शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून येईल. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो. या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाला एक जागा सहजपणे मिळू शकते. उद्धव ठाकरे गटाकडे १५ तर शरद पवार गटाकडे १० आमदार आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा केला तरी ४१ हा जादुई आकडा गाठणे सद्यस्थितीत कठीण दिसते. यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला राज्यसभेतील आपापल्या जागा गमवाव्या लागणार आहेत.उमेदवारी कोणाला ?भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर हे तीन जण निवृत्त होत आहेत. यापैकी राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लढायचे नसल्यास पुन्हा राज्यसभेचीसंधी मिळू शकते. प्रकाश जावडेकर यांना पुन्हा खासदारकी मिळण्याची शक्यता नसल्याचे पक्षात बोलले जाते. मुरलीधरन यांच्याबाबतचा निर्णय दिल्लीतच होईल. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेची खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे.काँग्रेसमध्ये कुमार केतकर हे निवृत्त होत आहेत. राज्यसभेसाठी अनेक इच्छूक असले तरी पक्षाध्यक्ष खरगे हेच निर्णय घेतील. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button