
*रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी**खेड एसटी आगाराला ५५ हजाराचा दंड*
रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी खेड एसटी आगाराला ५५ हजाराचा दंड ठोठावला आहे सन २०१७ पासून विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका खेड आगारावर ठेवण्यात आला आहे. हा दंड संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दिले आहेत. हा दंड सीट बेल्ट, अतिवेगाने वाहन चालवणे, वेग मर्यादांचे उल्लंघन करणे, धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे अशा विविध कारणांसाठी दंड ठोठावला आहे. एकूण २४ वाहनांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. www.konkantoday.com