
बावनदी आरवली खोकेधारकांना मिळणार नुकसान भरपाई -अशोक जाधव*
_ बावनदी ते आरवली परिसरातील खोकेधारकांना लवकरच ननुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते अशोक जाधव यांनी दिली.गेली चार साडेचार वर्ष संगमेश्वर तालुक्यातील बावनदी ते आरवली दरम्यान नॅशनल हायवे लगतचे खोकेधारक, दुकाने, चहा, टपर्या, घरे फळवाले यांच्या नुकसान भरपाईसाठी सातत्याने खेपा घालण्यात आल्या होत्या. कोकण भवन ते सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंत्यापर्यंत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला होता. सर्व विस्थापितांसहित ३१ मार्च २०२३ रोजी रणरणत्या उन्हात धरणे आंदोलन करण्ययात आले होते.www.konkantoday.com