- फ्रान्स देशाचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो हे भारताच्या दौर्यावर आले आहेत. भारत सरकार व फ्रान्स सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात दोन्ही देशांचे व्यापार व गुंतवणुकीबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला चालना देण्यासंबंधावर चर्चा झायाचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैतापूरचा विषय सरकारकडून पुढे रेटण्यात येत असल्याने राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जैतापूर अणूउर्जा हा भारत व फ्रान्स या देशांमधील करारानुसार होवू घातला आहे. सुमारे ९ हजार ९०० मेगावॅट क्षमतेचा अणुउर्जा प्रकल्प असल्याने स्थानिकांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला होता. या प्रकल्पाला विरोध करताना तरबेज सायेकर या तरूणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू देखील झाला होता. यामुळे या प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले होते. तसेच सरकारकडून हा प्रकल्प बासनात गुंडाळला जाणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पाबाबत केंद्र शासनाकडून सकारात्मक पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे. www.konkantoday.com
Back to top button