गुहागर-चिपळूण-कराड- विजापूर महामार्गावरील**गुहागरवासियांना मोबदला १ महिन्यात मिळणार?*
गुहागर-चिपळूण-कराड- विजापूर महामार्गावरील गुहागर दरम्यान रस्ता रूंदीकरणाचे काम रखडल्याने व भूसंपादन मोबदल्याची कार्यवाही न झाल्याने गुहागर येथील दीपक परचुरे यांनी प्रजासत्ताक दिनापासून साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी रखडलेल्या भूसंपादनाचा निवाडा व मोबदल्याबाबत एक महिन्यात कार्यवाही होणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित केले.गुहागर-विजापूर महामार्गावरील गुहागर ० कि.मी. ते १.८०० कि.मी. पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू नसल्यामुळे व मोडकाआगर पूल ते मोडकाआगर तिठा येथील कोणत्याही कामाला आजपर्यंत सुरूवात नसल्याने ग्रामस्थांसह तहसील कार्यालय, गुहागर येथे उपोषणाला बसणार असल्याचे पत्र दिपक परचुरे यांनी प्रांताधिकार्यांना दिले होते. www.konkantoday.com