- कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणार्याचा मोबाईल चोरट्याने लांबविला. प्रग्नेश चंदुभाई जानी (रा. गुजरात) असे या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी प्रग्नेश यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.प्रग्नेश हे २० डिसेंबर २०२३ रोजी जामनगर एक्स्प्रेस गाडीने मडगांव ते अहमदाबाद असा प्रवास करत होते. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आली असता चोरट्याने त्यांच्याजवळील आयफोन चोरून नेला, अशी तक्रार प्रग्नेश यांनी शहर पोलिसांत दिली.www.konkantoday.com
Back to top button