- गाईच्या केवळ दुधापासून नव्हे तर शेण, गोमुत्र यापासून उत्पन्न मिळते हे शेतकर्यांना पटवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या पुढाकाराने शेणापासून रंग बनवले जाणार आहेत. यासाठी राज्यात ६ कंपन्या येणार असल्याची माहिती गोसेवा आयोगाचे प्रदेशाध्यक्ष शेखर मुंदडा यांनी बोलताना दिली. तसेच यावर्षी गोवर्धन, गोवंश योजनेतून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला २५ लाखाचे अनुदान दिले जाणार असून शेण, गोमुत्र यापासून शेतकरी बनवेल त्या प्रत्येक वस्तूचे आयोग मार्केटींग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंदडा म्हणाले की, राज्यात १ कोटी ३९ लाख गायी आहेत. यात केवळ १३ लाखच देशी गायी आहेत. त्यामुळे ही संख्या वाढण्याची गरज आहे.www.konkantoday.com
Back to top button