उत्तुंग झेप घेण्यासाठी कष्ट अन चिकाटीची जोड हवी**- अभिनेते मोहन जोशी*
कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्यासाठी कष्ट आणि चिकाटीची जोड हवी. त्यातूनच नक्कीच यश मिळते तसे ते समीकरणच आहे. शिवाय प्रबळ इच्छाशक्ती असल्यास यशाचा मार्गही सहज सापडतो. त्याचबरोबर पडेल ते काम तर कष्ट घेण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी केले.येथील चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सास्कृतिक केंद्रात रविवारी ३३ विद्यार्थ्यांना सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांना पाठबळ, शिवाय त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप चतुरंग मारत असतानाही लोकांनीही तितकेच कौतुक या गुणवंतांचे केले पाहिजे असे ते म्हणाले. www.konkantoday.com