
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तिघे अल्पवयीन बाल न्यायालयात*
*________काही दिवसांपूर्वी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह इंस्टाग्राम स्टोरी व स्टेटस ठेवणार्या सातपैकी तिघांना अटक केली होती, असे असताना याप्रकरणी अन्य तिघा अल्पवयीन तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेत रत्नागिरी बाल न्यायालयात नेण्यात आले. आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी हिंदू समाज बांधव काहीसे आक्रमक झाले होते. घटनेप्रकरणी चिपळूण पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असे असताना अन्य चौघांजणांचा शोध सुरू असताना यामध्ये तीन अल्पवयीन तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोघेजण चिपळूण शहरातील तर, अन्य एक खेड परिसरातील असल्याची माहिती पुढे येत आहे. त्या तिघांना रत्नागिरी येथील बाल न्यायालयात नेण्यात आले आहे . www.konkantoday.com