
धामापूर भायजेवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर भायजेवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. यश महाडिक (२२) वर्षे आणि विजय भालेकर( २१)वर्षे या दोघांचा मृत्यू झाला आहे.धामापूर भायजेवाडी येथील .पाणलोट मधून बंधारा बांधण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हा बंधारा भरून वाहत आहे. धामापूर पीर येथील पाच जण शनिवारी दुपारी पोहायला गेले होते. यापैकी यश महाडिक आणि विजय भालेकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com