
श्रीमान भागोजीशेठ किर यांच्या पुण्यतीथीनिमित्त*24 फेब्रुवारी रोजी रॅली,सहभोजन,सहभजन कार्यक्रमांचे आयोजन
दानशूर श्रीमान भागोजीशेठ किर यांच्या पुण्यतीथीनिमित्त अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ,रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि पतित पावन मंदिर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 24 फेब्रुवारी 2024 रोजी रॅली,सहभोजन,सहभजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सकाळी 9.30 वा.श्री भैरी मंदिर खाालची आळी येथून भव्य रॅलीची सुरुवात करुन दुपारी 12 वा.पतितपावन मंदिर येथे रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे.यावर्षी 3 हजार नागरिक या कार्यक्रमांचा लाभ घेणार असल्याची माहिती भंडारी समाजाचे नेते राजीव किर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भागोजीशेठ किर यांचे नातू अंकुर किर, नातसून प्रेमा किर आणि विविध जातीचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमावेळी धार्मिक,संगीत,कवी,लेखक,बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात येणार आहे.त्यासाठी सर्व समाजातील अशा व्यक्तींची माहिती 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ कार्यालय,भागिर्थी भुवन खालची आळी ,रत्नागिरी येथे आणून द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने श्रीमान भागोजीशेठ किर यांच्यासोबत काम केले आहे अशा व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देउन विशेष गौरव पुरस्कार देण्याचे आयोजिले आहे.www.konkantoday.com