- . *रत्नागिरी, -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि. 30 व 31 जानेवारी रोजी एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्टस कॉम्प्लेक्स डेरवण ता. चिपळूण येथे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुला/मुलींची शासकीय वसतीगृहे व निवासी शाळा कार्यरत आहेत. यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौध्दिक विकास व्हावा या हेतूने विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागात मुलींचे 20 व मुलांचे 23 अशी एकूण 43 शासकिय वसतीगृहे व 1 निवासी शाळा कार्यरत आहेत. शासकीय वसतीगृहे व निवासी शाळा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुदृढ व सक्षम नागरिक बनविण्यासाठी सन 2023-24 या वर्षात विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग मुंबई वंदना कोचुरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे व दि. 31 जानेवारी 2024 रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्टस कॉम्प्लेक्स डेरवण ता. चिपळूण या क्रीडांगणावर स्पर्धे दरम्यान क्रिकेट, खो-खो, बॕडमिंटन इ. सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत. या महोत्सवात मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शासकीय वस्तीगृहात प्रवेशित विद्यार्थी व संघ तसेच मुबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती आयोजक सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण संतोष चिकणे यांनी दिली .www.konkantoday.com
Back to top button