
श्रीकांत गोवंडे यांच्या तैलचित्राचे लोटिस्मात उद्या अनावरण*
लो. टिळक स्मारक वाचन मंदिरचे माजी कार्यवाह आणि नामवंत संस्कृत शिक्षक कै. श्रीकांत गोवंडे यांच्या तैलचित्राचे अनावरण लोटिस्मात होणार आहे. डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बापट यांच्या हस्ते दि. ३० जानेवारी रोजी त्यांच्या स्मृतिदिनी तैलचित्र अनावरण होत आहे.श्रीकांत गोवंडे हे चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृत अध्यापन करीत होते. त्यांची विविध विषयावर शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचा संस्कृतचे विद्वान म्हणून सन्मान केला होता. सरांच्या स्मृत्यर्थ लोटिस्माने घेतलेल्या कथा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या वेळी होणार आहे. या कथा स्पर्धेत प्रथम श्रीमती विशाखा चितळे, द्वितीय रत्नाकर विष्णू रहाटे आणि तृतीय क्रमांक अदिती अशोक तांबे यांनी प्राप्त केला आहे.तसेच लो. टिळक स्मारक वाचन मंदिराकडून प्रतिवर्षी दिले जाणारे आदर्श वाचक पुरस्काराचे वितरणही यावेळी होणार आहे. आदर्श वाचक श्री. निलेश बा. कटारिया, श्री. सचिन सुरेश उतेकर, सौ. नीला विजय बापट आणि सौ. सुवर्णा सुरेश बहुलेकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी ऍड. मकरंद साठे उपस्थित राहणार आहेत.www.konkantoday.com