- लांजा तालुक्यातील शिपोशी येथे ९ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १ ते ३ मार्च २०२४ दरम्यान वै. वि. आठल्ये विद्यामंदिर शिपोशी येथे होणार आहे. राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबई यांच्यावतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार, व्याख्यान, कविता, पोवाडे सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात होणार आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी दिली.साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा, नदीजलपूजन, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर २ मार्च रोजी ग्रंथदिंडी संमेलन उदघाटन सोहळा, व्याख्याने, काव्य संमेलन तसेच रात्री १० वा. शाहर खामकर हे पोवाडा सादर करणार आहेत. तर ३ मार्च रोजी पारितोषिक वितरण समारंभ, नववधुंचा सन्मान, जीवनगौरव पुरस्कार, व्याख्यान आदी कार्यक्रम होणार आहेत.www.konkantoday.com
Back to top button