
कोकण रेल्वेतील प्रवासी साडेबारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग गाडीत विसरला, सुरक्षा दलाने परत मिळवून दिली
कोकण रेल्वेने प्रवास करताना अनेक वेळा दागिने चोरीला व मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत मात्र कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बारा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग सुरक्षित रित्या प्रवाशाला परत मिळाली असून कोकण रेल्वेच्या सुरक्षा दलाने या कामी मोलाची कामगिरी बजावली आहे वसई येथून राजापूरला मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा प्रवासी 17 तोळे सोन्याचे दागिन्यांची बॅग रेल्वेत विसरला. त्यांनी याची माहिती राजापूर स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना दिली. स्टेशनमास्तरांनी थिवी रेल्वे सुरक्षा दलाला याची माहिती दिली. कणकवली येथे रेल्वे सुरक्षा दलाकडे चौकशी केली असता जनरल डब्यात बॅग आढळली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल अनंत व प्रवीण मोरे यांनी थिवी स्थानकावर गाडीची तपासणी केली असता काळ्या रंगाची बॅग आढळली. त्यांनी कोकण रेल्वे अधिकार्यांच्या उपस्थितीत बॅगची तपासणी केली असता प्रवाशाने सांगितल्याप्रमाणे दागिने आढळून आले. बॅगेमध्ये 5 तोळ्याचे मंगळसूत्र, 3 तोळ्याचा हार, 4 तोळ्याच्या एकूण 4 बांगड्या, 3 तोळा 5 ग्रॅम वजनाच्या एकूण 4 चेन, 11 ग्रॅमच्या अंगठ्या, कानातील कर्णफुल व झुमके असा एकूण 17 तोळे 2 ग्रॅमचा मुद्देमाल आढळून आला. प्रवाशांना याची माहिती दिल्यानंतर ते थिवी येथे पोहोचले. चौकशीवेळी दागिने त्याचेच असल्याची खात्री करण्यात आली. रेल्वे पोलिसांकडून पंचनामा करुन 12 मे रोजी पहाटे सदर दागिने व बॅग प्रवासी वीरेंद्र विलास खाडे यांच्याकडे देण्यात आले. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दल, कोकण रेल्वे अधिकारी व पोलिसांकडून मिळालेल्या सहकार्याबाबत कौतुक केले.www.konkantoday.com