
*मुंबई गोवा महामार्ग* *चौपदरीकरणाच्या कामात**राजापुरात येत असलेल्या अडचणी बाबत लवकरच निर्णय*
___मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात राजापूर एसटी डेपोसमोर प्रियदर्शनी वसाहत व बंगलवाडीकडे जाणारा रस्ता तातडीने करून देताना एसटीडेपो समोर सर्कल की जंक्शन याबाबतही लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार असून या परिसरातील पथदिपही लवकरच सुरू केले जणार आहेत.तसे ठोस आश्वासन प्रशासन आणि ठेकेदाराकडून देण्यात आल्याची माहिती राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी दिली आहे.आता ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचेही अॅड. खलिफे यांनी सांगितले.मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात राजापूर एसटी डेपोसमोर सर्कल की जंक्शन याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही. तर प्रियदर्शनी वसाहत, बंगलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतही कोणीतही कार्यवाही केलेली नाही, तर अनेक ठिकाणी पथदिप सुरू करण्यात आलेले नाहीत. याबाबत येत्या २६ जानेवारी पुर्वी प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा ईशाराही खलिफे यांनी दिला होता.www.konkantoday.com