
*मनोधैर्य योजनेतून पीडितांना ४ कोटी ६१ लाखांची मदत*_
_मनोधैर्य योजनेंतर्गत प्रकरणांतील पीडितांना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सुमारे ४ कोटी ६१ लाखांची मदत देण्यात आली. बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ल्यातील पीडितांना मनोधैर्य योजनेतून मदत देण्यात येत असते. आलेल्या सर्व अर्जांचा विचार करून मदत देण्यात आली असून आता एकही अर्ज प्रलंबित नसल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.शासनाने २१ ऑक्टोबर २०१३ रोजी मनोधैर्य योजना सुरू केली. त्या मागचा उद्देश हा पीडित व्यक्ती अथवा त्यांच्या वारसांना निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या आधार सेवा उपलब्ध करून देणे व त्यांचे पुनर्वसन करून देणे हा होता. त्यात असलेल्या त्रुटी दूर करून २०१७ पासून ही योजना विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली व गुन्ह्यातील पीडितेवर झालेल्या गुन्ह्यांच्या परिणामांना विचारात घेवून रक्कम रूपये ३ लाखापर्यंत व गंभीर परिणाम असल्यास रक्कम रूपये १० लाख या मर्यादेपर्यंत नुकसानभरपाई देण्याची या योजनेत तरतूद आहे. www.konkantoday.com