नमन व जाखडी लोककलेचा लोककला प्रकारात समावेश करण्याची मागणी*_
*_ _नमन लोक कला रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री तथा उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांना नमन व जाखडी लोककलेचा लोककला प्रकारात समावेश व्हावा. सांस्कृतिक परिपत्रकात त्यांचा समावेश व्हावा आणि कलेला राजाश्रय मिळावा, यासाठी फेब्रुवारी 2023 मध्येच पत्र दिले होते. त्या पत्रा संदर्भात पुन्हा त्यांना एकदा स्मरणपत्र गुरुवार 25 रोजी सावरकर नाट्यगृह रत्नागिरी याठिकाणी त्यांची भेट घेत नमन लोककला रत्नागिरी जिल्हा यांनी दिले आहे.कोकणातील नमन लोककला ही पारंपरिक लोककला प्रकारातील एक कला आहे. त्याचप्रमाणे जाखडी अर्थात शक्ती तुरा ही सुद्धा मोठ्या प्रमाणात सादरीकरण केली जाणारी कला आहे. या लोककलेचा शासनाच्या लोककला प्रकारांमध्ये समावेश व्हावा आणि या सर्व लोककला आणि लोककलावंतांना राजाश्रय मिळावा यासाठी कलावंतांची धडपड सुरू आहे. लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा संस्थेमार्फत या मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्री तथा उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे या आधीच यासंदर्भातील निवेदन दिलेले आहे. त्याच्यावरती मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून योग्य सहकार्य सुद्धा सुरू आहे. तरीसुद्धा रत्नागिरी सावरकर नाट्यगृह येथे पालकमंत्र्यांची पुन्हा भेट घेत या लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि सहकाऱ्यांनी मिळून एक पुन्हा स्मरणपत्र दिले आहे. यावेळी मात्र पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नमन व जाखडी लोककलेला राजाश्रय मिळून देण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असे आश्वासन दिले आहे.www.konkantoday.com