कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला, 3.1 रिश्टर स्केल एवढी तिव्रता
साताऱ्यातील कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती समोर आले आहे.
साताऱ्यातील कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी सायंकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून 6 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. सुदैवानं घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
रविवारी कोयना धरण परिसरातात जाणवलेला धक्का सौम्य होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 एवढी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमीटर अंतरावर होता अशी माहिती आहे. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नाही अशी माहिती धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com