
कोकण मार्गावर वीकेंडला कोकण रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले
सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावरून धावणार्या सर्वच रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. त्यात रविवारी बिघडलेल्या वेळापत्रकाने विकेंडला प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. जबलपूर-कोईमतूर एक्स्प्रेस तब्बल ५ तास उशिराने मार्गस्थ झाली. अन्य ७ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली.
सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर सर्वच रेल्वेगाड्या विक्रमी कर्दीने धावत आहेत. एकीकडे रेल्वेगाड्यांना उसळणार्या गर्दीमुळे प्रवाशांची यातायात सुरू असतानाच रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाने प्रवाशांच्या मार्गात रखडपट्टीचा अडसर निर्माण झाला. उशिराने धावणार्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना स्थानकात तासनतास तिष्ठतच बसावे लागले. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. www.konkantoday.com