कर्नाटक राज्यातील मिरची व्यापारांविरुद्ध संगमेश्वरातील व्यापारी संघटनेचा आक्रमक पवित्रा, दुकाने बंद करायला लावली*
कर्नाटक मधून आलेल्या मिरची व्यापाऱ्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मिरचीची दुकाने थटली होती मात्र ही मिरची कमी दर्जाची असून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा दावा करत संगमेश्वरातील व्यापारी संघटना आक्रमक झाली व त्यांनी या व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास लावली .संगमेश्वर तालुक्यातील ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटक मधील मिरची व्यापाऱ्यांनी त्वरित दुकाने हटवावेत यासाठी एकत्र येऊन व्यापाऱ्यांना त्वरित दुकाने बंद करण्यास सांगितले.कर्नाटक मधील काही व्यापारी कमी दर्जाची मिरची आणि मिरची ओली करून विकत असल्याचे समजल्यानंतर नावडी ग्रामपंचायतचे सरपंच विवेक शेरे, व्यापारी गुरुप्रसाद भिंगार्डे, स्वप्निल नारकर ,नदीम मेमन, इब्राहिम मेमन, राजेश नारकर, प्रशांत बेंडके, सिद्धिक भाई आदी घटनास्थळी येऊन ग्राहकांची फसवणूक करणारे दुकाने त्वरित बंद करा असे कर्नाटक मधील व्यापाऱ्यांना सांगितले तसेच व्यापाऱ्यांनी ही मिरची कशी दर्जाहीन आहे याबाबत ग्राहकांना समजून सांगितले. त्यानंतर कर्नाटक मधील व्यापाऱ्यानी आपण दुकाने येथून उचलणार असल्याचे सांगितले त्यानंतर संतप्त व्यापारी शांत झाले. www.konkantoday.com