
अलोरेचे माजी सरपंच भाऊ मोहिते यांच्यावर प्राणघातक हल्ला*_
चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील माजी सरपंच प्रकाश उर्फ भाऊ मोहिते यांच्यात व खलिल गफूर नेवसेकर यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यामध्ये खलिल नेवसेकर याने भाऊ मोहिते यांच्या हातावर आणि मानेवर वार केले. त्यामध्ये भाऊ मोहिते गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर चिपळूण येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर खलिल नेवसेकर यांना अलोरे शिरगाव पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलोरे येथील खलिल नेवसेकर दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान भाऊ मोहिते यांच्या घरात गेला. या वेळी सुरूवातीला किरकोळ वाद झाले त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीपर्यंत पोहोचले. यामध्ये खलिल नेवसेकर यांनी मटण कापण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या सतुरा याने भाऊ मोहिते यांच्या हातावर आणि मानेवर सपासप वार केले. त्यात भाऊ मोहिते रक्तबंबाळ होवून जखमी झाले. त्यांना तत्काळ चिपळूण येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. www.konkantoday.com