वन वेतन- वन इलेक्शनला जनतेचा कौल
एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला देशातील ८१ टक्के लोकांनी सहमती दर्शविली आहे. वन नेशन-वन इलेक्शन पॅनलला देशभरातून २१ हजार सूचना प्राप्त झाल्या आहेत. १७ राजकीय पक्षांनीही आपले मत मांडल्याचे समितीने अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले.माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील वन नेशन-वन इलेक्शन समितीने ५ जानेवारीला नोटीस जारी करत १५ जानेवारीपर्यंत जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. मात्र कॉंग्रेस आय व तृणमूल कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा वन नेशन- वन इलेक्शनला विरोध आहे.समितीच्या तिसर्या बैठकीत एकूण २०,९७२ सूचना प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले. गुलाम नबी आझाद, कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल, एन. के. सिंग, माजी लोकसभा महासचिव सुभाष सी कश्यप आणि माजी मुख्य दक्षता अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या सूचनांचीही समितीने दखल घेतली. आता समितीची बैठक २७ जानेवारीला होवू शकते. www.konkantoday.com