
सावरकर नाट्यगृहाचे दुरूस्तीचे काम पुर्ण , आज २६ जानेवारीला पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोकार्पण
सावरकर नाट्यगृहाचे दुरूस्तीचे काम पुर्ण झाले असून आज २६ जानेवारीला पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर नाट्यगृहाची वातानुकुलीत यंत्रणा पूर्णपणे बदलली आहे. नवीन व्ही. आर.एफ. यंत्रणा बसविली आहे. जेणेकरून कुलींग चांगल्या प्रकारे होईल. छताच्या संपूर्ण पत्र्यांच्या खाली 5 ते 6 इंचाचा इन्सुलेशचा थराचे कोटिंग आहे. अद्यावत साउंड सिस्टिम बसविण्यात आली असून नाट्यगृह पूर्णपणे अँकोस्टिक करण्यात आले आहे. नाट्यगृहाचे दुरूस्तीचे काम पुर्ण झाले असून २६ जानेवारीला सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे, पालिकेच्या वि दा. सावरकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली होती. अनेकांच्या तक्रारी होत्या. नाट्यकर्मींनीही नाट्यगृहाची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी केली होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी १० कोटी लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ७ कोटी मंजूर झाले आहेत. निर्माण गृपच्या माध्यमातून नाट्यगृहाच्या दुरूस्तीचे काम ७० दिवसात करण्यात येणार होते. त्यानुसार हे काम पुर्ण होत आले आहे.
नाट्यगृहामध्ये वातानुकुलीत यंत्रणा पूर्णपणे बदलली आहे. कुलींग चांगल्या प्रकारे होणेण्यासाठी छताची उंची पी.ओ.पी करून कमी करण्यात आली आहे. छताच्या संपूर्ण पत्र्यांच्या खाली 5 ते 6 इंचाचा इन्सुलेशचा थर कोटिंग स्वरूपात बसविलेला आहे. त्यामुळे पत्र्यावरील तापमान जाणवणार नाही. स्टेज लाईट सुध्दा पूर्णपणे नविन बसविण्यात आली आहे. त्यामध्ये पार लाईट, कॅन लाईट, स्पॉट लाईट आदींचा समावेश आहे. साऊंड सिस्टिम अद्यावत करणेत आलेली आहे. नाट्यगृह पूर्णपणे अँकोस्टिक केले आहे. जेणेकरून आवाज सुस्पष्ट ऐकू येणार आहे. नाट्यगृहामध्ये फायर सिस्टिम बसविणेत आलेली आहे. खुर्चा आणि स्टेजवरील पडदा, ट्रॅक, विंग नवीन बसविण्यात आली आहे. ग्रीन रूम आणि व्ही.आय.पी. समचे रिनोव्हेशन करणेत आलेले आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृह, पाणी व्यवस्था व इतर अनुषंगाने कामे सुध्दा करण्यात आली आहेत. स्वतंत्र वीज जोडणी आहे, तसेच जनरेटरचीही व्यवस्था आहे. मात्र नाट्यगृहाच्या नवीन भाडे आकारणीबाबत अजून निर्णय झालेला नाही. परंतु यापुढे नाट्यगृहात कचरा होऊ नये यासाठी बाहेरच्या वस्तू खावून दिल्या जाणार नाहीत.
www.konkantoday.com