
लोटे गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलन*
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान खेड-लोटे गोशाळेच्या वतीने ज्येष्ठ गोभक्त, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २६ ते २८ जानेवारी दरम्यान गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांसह अनेकांची उपस्थिती लाभणार असून संमेलनात ज्या शेतकर्यांना गाई व बैल हवे असतील त्यांना ते मोफत दिले जाणार असल्याची माहिती गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळावा अशा अनेक उद्देशाने या चळवळीची सुरूवात कोकणातून व्हावी, विषारी खतांपासून शेती मुक्त व्हावी यासाठी राज्य गोसेवा आयोग, गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्य, आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट, महाजन परिवार ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखाली या गोसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील हे सर्वात मोठे गोसंमेलन होणार असून यात ५०० गोशाळांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.www.konkantoday.com