
मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग, एकाचा मृत्यू
मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात भीषण आग लागली आहे. मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचं कारण अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच आहे.एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून प्लॅटिनम मॉल आणि रहिवासी इमारती खाली करण्यात आल्या आहे. 16 अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेची माहिती मिळताच 16 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. लाकडाचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com