मनोज जरांगे पाटील दुपारी 2 वाजता त्यांची पुढची भूमिका जाहीर करणार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. थोड्यावेळापूर्वी त्यांची सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झालं याची माहिती ते दुपारी 2 वाजता सर्वांना देणार आहेत.याआधी त्यांनी एपीएमसीजवळच्या शिवाजी चौकातून जमलेल्या सर्व आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण साउंड सिस्टिम पुरेशी नसल्याने सर्व कार्यकर्त्यांपर्यंत आवाज जात नसल्याचं कारण देऊन जरांगे यांनी नवी साउंड सिस्टिम येईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणाचाही कुठलाही गैरसमज होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत जरांगे यांच्या हाती एक जीआर देण्यात आला आहे. तो जीआर ते 2 वाजता वाचून दाखवणार आहेत.
www.konkantoday.com