नागकोईल-गांधीधाम विद्युत इंजिनवर धावणार

कोकण मार्गावर धावणारी लांब पल्ल्याची नागरकोईल-गांधीधाम साप्ताहिक एक्स्प्रेसही बुधवारपासून डिझेलऐवजी विद्युतशक्तीवर धावू लागल्याने प्रवास आणखी वेगवान अन प्रदूषणमुक्त झाला आहे. या एक्सप्रेसमुळे विद्युतशक्तीवर धावणार्‍या रेल्वेगाड्यांची संख्या ३५ वर पोहचली आहे. कोकण मार्गावर यापूर्वी ३४ रेल्वेगाड्या डिझेलऐवजी विद्युत इंजिनवर धावत होत्या. त्यात आता १६३३६/१६३३५ क्रमांकाच्या नागरकोईल-गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसची भर पडली आहे. आता केवळ मोजक्याच रेल्वेगाड्या कोकण मार्गावर डिझेलवर धावत आहेत. या गाड्यांसाठी विद्युत इंजिनची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button