विनापरवाना गुरांची वाहतूक, तिघांवर गुन्हा दाखल…
_________________बोलेरो पिकअप गाडीतून विनापरवाना ४ गुरांची कोंडून वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी २३ जानेवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास तालुक्यातील हर्चे बेनीफाटा येेथे करण्यात आली.तालुक्यातील साटवली गांगेवाडी येथून बेकायदेशीररित्या जनावरांची विक्र्री केली जात असल्याची खबर फिर्यादी अभिषेक सुरेश तेंडुलकर (३५, रा. भडे पेवखलवाडी, ता. लांजा) यांना मिळाली होती. या बाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार अजय नारायण तरवळ (४३) व संदीप राजाराम जाधव (३५, रा. साटवली गांगेवाडी) हे बोलेरो पिकअप (क्र. एम.एच. ०८ एपी-६५५४) या गाडीतून हर्चे तांबेवाडी येथील विठ्ठल धोंडू शिरसेकर (६६) यांच्या मालकीच्या गोठ्यातून ४ गुरे दाटीवाटीने वेदना होतील, अशा पद्धतीने घेवून जाताना २३ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता हर्चे बेनीफाटा येेथे आढळून आले. यामध्ये २२ हजार रुपये किंमतीची चार गुरे व ४ लाख रुपये किंमतीची सफेद रंगााची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वार्यावरजिल्हा प्रशासनाच्या खुल्या प्रवर्गातील जातीच्या सर्वेक्षणात आता जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ९ वी १० वीचे महत्वाचे शेवटचे महिने सुरू असतानाच शाळेतून शिक्षक गायब झाल्याने आता या शिक्षकांविना शाळा कशी चालवायची आणि राहिलेला अभ्यासक्रम नक्की कसा पूर्ण करायचा, हा प्रश्न आता जिल्ह्यातील शाळांना पडला आहे. त्यामुळे प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे आता खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण महत्वाचे ठरत असल्याची चर्चा रंगत आहे.सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आता मात्र या आरक्षणाचा फटका माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बसत आहे. नुकतेच शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सोपवले आहे. www.konkantoday.com